मुंबई- राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या लाखाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. राज्यात नव्या 13 हजार 659 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 22 लाख 52 हजार 057 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात 9 हजार 913 रुग्ण 24 तासात कोरोना मुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 20 लाख 99 हजार 207 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 13,659 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 22 लाख 52 हजार 057 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 99 हजार 8 इतके आहेत.
हेही वाचा-शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणे 'कंगना'ला पडतंय महागात
राज्यात रुग्णांची नोंद
- मुंबई महानगरपालिका- 1,539
- ठाणे- 205
- ठाणे मनपा- 257
- नवी मुंबई-166
- कल्याण डोंबिवली- 399
- पनवेल मनपा- 132
- नाशिक-235
- नाशिक मनपा-750
- अहमदनगर- 249
- जळगाव- 495
- जळगाव मनपा- 226
- नंदुरबार- 118
- पुणे- 533
- पुणे मनपा- 1,384
- पिंपरी चिंचवड- 590
- सोलापूर- 122
- सातारा - 193
- औरंगाबाद मनपा- 560
- जालना-310
- बीड - 115
- नांदेड मनपा- 152
- अकोला-155
- अकोला मनपा- 184
- अमरावती- 107
- अमरावती मनपा- 294
- यवतमाळ-403
- बुलडाणा-263
- वाशिम - 134
- नागपूर- 347
- नागपूर मनपा-1,513
हेही वाचा-'मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या'; उदयनराजेंचा गर्भित इशारा