महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1145 नवे रुग्ण, 32 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1145 नवे रुग्ण आढळून आले असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

mumbai corona
मुंबई कोरोना

By

Published : Oct 30, 2020, 9:46 PM IST

मुंबई -आज मुंबईत कोरोनाच्या नव्या 1145 रुग्णांची नोंद झाली असून, 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 157 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 1145 नवे रुग्ण आढळून आले असून 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 25 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 27 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 56 हजार 507 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 218 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1101 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 27 हजार 142 वर गेला आहे. सध्या मुंबईत 18 हजार 438 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 157 दिवस तर सरासरी दर 0.44 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 609 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 7 हजार 457 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 15 लाख 13 हजार 154 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details