महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kurla Murder Case : 'त्या' मृतदेहाचे उकलले गूढ ; मैत्रिणींच्या मदतीने संपवले पतीच्या प्रेयसीला, 3 महिलांना अटक - पतीच्या प्रेयसीचा खून

महिलेने तिच्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पतीच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यात घडली (Kurla murder case Mumbai) आहे. याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलीसांनी तीन महिलांना बेड्या ठोकल्या (Nehrunagar police arrested 3 women) आहेत.

Kurla Murder Case
पतीच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या

By

Published : Oct 8, 2022, 9:23 AM IST

मुंबई : महिलेने तिच्या दोन मैत्रिणींच्या मदतीने पतीच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्ल्यात घडली (Kurla murder case Mumbai) आहे. पतीच्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर या महिलेने मृतदेह कुर्ला येथील बंटर भवनासमोरील नाल्यात फेकला होता. शवविच्छेदन केल्यानंतर या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलांनी मृतदेह गोणीत भरून तो नाल्यात टाकला होता. त्यानंतर कुजलेल्या स्थितीत मृतदेह गोणीत टाकलेला पोलिसांना आढळला. याबाबत नेहरूनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी आता पोलीसांनी तीन महिलांना बेड्या ठोकल्या (Nehrunagar police arrested 3 women) आहेत.

प्रतिक्रिया देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर भाबळ,

पतीचे 'त्या' महिलेशी कथित प्रेमसंबंध -डॉली भालेराव, मीनल पवार आणि शिल्पा पवार अशी आरोपींची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, दोन महिलांनी रिक्षातून एक गोणी आणल्याचे समोर आले होते. रिक्षा चालकाचा शोध लागताच महिलेच्या खुनाचे गूढ उकलले. आरोपी मिनल पवार हिच्या पतीचे मयत महिलेशी कथित प्रेमसंबंध होते. याचाच राग आरोपी मिनल पवार या महिलेच्या मनात होता. मिनल पवारने तिची बहिण शिल्पा पवार आणि मैत्रीण डॉली भालेराव यांच्या मदतीने ही हत्या (Kurla Murder Case) केली.


अशी घडली घटना -आरोपी मिनलचा पती योगेशचे मयत महिलेशी प्रेमसंबंध होते. योगेशने आपल्या प्रेयसीला माहुल येथे पत्नीची मैत्रीण डॉलीच्या घरी नेवून ठेवले होते. डॉलीने याची माहिती मिनलला दिली. त्यानंतर मिनल डॉलीच्या घरी गेली. मिनलने आपली बहीण शिल्पालाही सोबत घेतले. घरी पोहोचताच पतीच्या प्रेयसीचा मिनलने गळा दाबून खून केला. या वेळी डॉली आणि शिल्पाने तिला मदत केली. त्यानंतर मृत महिलेचा मृतदेह एका गोणीत भरून तो कुर्ला येथील बंटर भवन येथील नाल्यात आणून टाकला होता. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी चोवीस तासात तपास करून तिन्ही महिला आरोपींना अटक केली (Nehrunagar police) आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details