महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Neelam Gorhe Slammed BJP : महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणे ही भाजप कार्यकर्त्यांची संस्कृती आहे का- नीलम गोऱ्हे - नीलम गोऱ्हे जितेन गजारिया टीका

भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी ( BJP maharashtra IT cell chief ) जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. त्यावरून डॉ. नीलम गोऱ्हे  ( Neelam Gorhe on offensive tweets ) यांनी भाजपवर टीका केली आहे.

नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे

By

Published : Jan 6, 2022, 10:12 PM IST

Updated : Jan 6, 2022, 10:45 PM IST

पुणे -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट ( offensive tweets against Rashmi Thackeray ) केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे .त्यांच्या या ट्विटनंतर मोठ्या प्रमाणात जितेन गजारीया यांच्यावर टिका ( Neelam Gorhe on Jiten Gajaria ) करण्यात येत आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखील टिका केली आहे.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या ( Neelam Gorhe on offensive tweets ) की, महिलांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणे ही भाजप कार्यकर्त्यांची संस्कृती आहे का? भाजप नेत्यांनी हे सांगावे, अशी टीकादेखील गोऱ्हे यांनी केली आहे.

नीलम गोऱ्हे यांची भाजपवर टीका

हेही वाचा-Chhagan Bhujbal On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील पुण्यातून मोदींच्या पुण्याईने निवडून आले.. छगन भुजबळांचा टोला

ट्विट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले-

भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी ( BJP maharashtra IT cell chief ) जितेन गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्वीट करताना ‘महाराष्ट्राची राबडी देवी’ असे शब्द वापरले आहेत. या ट्विटवरुन सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून भाजपवर टिका होत आहे. या ट्विटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या ट्विटमागे आणि त्यामधील मजकुरामागे काय हेतू होता याबद्दल पोलीस चौकशी करत आहे.

हेही वाचा-Nana Patole On PM Security Breach : पंतप्रधानाच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावे : नाना पटोले

Last Updated : Jan 6, 2022, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details