मुंबई - बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shinde ) यांनी शिवसेनेच्या चिन्ह आणि पक्षावर दावा ठोकल्यानंतर शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांनी त्यांचा गट प्रहार किंवा भाजपमध्ये विलिन करावा, असे खडे बोल सुनावले. त्यांनी केलेल्या दाव्याची हवा काढून टाकली. शिवसेनेची एक राज्यघटना आहे, ती अशी बदलता येत नाही, असेही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. ( Nilam Gorhe On Eknath Shinde )
शिंदेंच्या स्वप्नांचा चक्काचूर - थेट मातोश्रीला आव्हान दिलेल्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मात्र तीस वर्षे सेनेत असलेले शिंदे शिवसेनेच्या राज्यघटनेबाबत अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.
काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे - मुळ पक्षांचे नाव हे शिंदे गटाला वापरता येत नाही. त्यामुळे त्या सर्व आमदारांना प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. महाराष्ट्रात गैरसमज पसरवल्या जात आहे, की शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळणार. मात्र निवडणूक आयोगाचा नियम आहे. त्यावर निर्णय घेण्यात येईल. राज्याची एक राज्यघटना आहे. त्यानुसार शिवसेनेची ही राज्यघटना आहे. ती कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागेल. अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल. मात्र शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल, असे सांगत गोऱ्हे यांनी घटनात्मक तरतुदीचा दाखला दिला. हा राज्य घटनेच्या परिषिष्ठाप्रमाणे कायदा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.