मुंबई -गुजरातमधील खासगी कंपनीकडून ईव्हीएम मशीन निवडणुकीसाठी आणण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. तेथूनच ईव्हीएम मशीन आणण्यामागचे नेमके कारण काय? असा सवाल राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी एका मुलाखतीत विचारला होता. याबाबत विचारले असता त्यांनी व्हीव्हीपॅटप्रमाणे मतदान झाले नसल्याच्या तक्रारीबाबत चौकशी होण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त केले. यावेळी मुलाखतीमधील प्रश्न राज्यातील निवडणुकीसंदर्भात नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
'व्हीव्हीपॅटसोबत मतदान जुळत नसल्याच्या तक्रारींबाबत चौकशी होणे आवश्यक' - Neela Satyanarayan interview
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये खूप ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे वृत्त माध्यमांवर दिसून आले. हे जर खरे असेल तर त्याची चौकशी व्हावी, असे निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे.
काही ठिकाणी व्हीव्हीपॅटवर ज्या व्यक्तीला मतदान केले त्याचे नाव आले नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. हे सर्व पुराव्यानिशी समजू शकते. त्यामुळे त्याची चौकशी होण्याची गरज राज्याचे माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये खूप ठिकाणी गैरप्रकार घडल्याचे वृत्त माध्यमांवर दिसून आले. हे जर खरे असेल तर त्याची चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले.
काय झाली होती माध्यमांवर चर्चा -
दरवर्षीप्रमाणे ईव्हीएम मशीन या ठरवलेल्या बंगलोर आणि इतर शहरातील सरकारी विश्वासातील कंपनीकडून किंवा निवडणूक आयोगाकडून मागविल्या जातात. त्या मागविलेल्या मशीनवर सरकारची व लोकांची विश्वासहर्ता असते. अचानक मागील निवडणुकीत आणि या यंदाच्या निवडणुकीत मशीन्स या गुजरातमधून मागवण्यात आल्याचे बोलले जाते. ते का? आणि जर मशीन बिघडल्या तर त्या तिकडेच दुरुस्तीसाठी पाठवाव्या लागतात. मग हे असे का? असा सवाल माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी माध्यमावरील चर्चेदरम्यान विचारला होता. परंतु, हे प्रश्न महाराष्ट्राच्या निवडणुकीला अनुसरून विचारले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.