मुंबई -एनडीएच्या राष्ट्रपती पदाचा उमेदवार द्रौपदी मुर्मू ( NDA presidential candidate Draupadi Murmu ) आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. मुंबईत द्रौपदी मुर्मू या भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाचे आमदार यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान द्रौपदी मुर्मू या मुंबईत दाखल होणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) हे विमानतळावर जाणार आहेत. त्यानंतर विमानतळ ( Airport ) परिसरात असलेले पंचतारांकित हॉटेलमध्ये द्रौपदी मुर्मू भारतीय जनता पक्षाचे आमदार व खासदार आणि एकनाथ शिंदे गटाच्या सर्व आमदार त्यांची भेट घेणार आहेत.
द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर जाणार का? -एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी देखील पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात कोठेही उद्धव ठाकरे यांच्या भेटी संदर्भात आयोजन केलेलं नाही. याआधी राष्ट्रपती पदाचे उमेदवार ज्या वेळेस मुंबईत आले होते. त्यावेळेस त्या उमेदवारांकडून ठाकरे कुटुंबीयांची भेट मातोश्रीवर जाऊन घेण्यात आली होती. त्यामुळे द्रोपती मुर्मू उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेणार का ? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
द्रौपदी मुर्मू आज घेणार YSRCP खासदार आणि आमदारांची भेट -NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ( NDA presidential candidate ) द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) आज YSRCP खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. मंगळागिरी येथील एका सभागृहात दुपारी तासभर ही बैठक होणार आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी ( CM Jagan Mohan Reddy ) यांच्या निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम पार पडेल. YSRCP ने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत NTA उमेदवार मुरमुक यांना पाठिंबा जाहीर केल्याची माहिती आहे. त्या दुपारी 2.45 वाजता गन्नावरम विमानतळावर ( Gannavaram Airport ) पोहोचतील आणि तिथून त्या मंगलगिरीच्या फंक्शन हॉलमध्ये दाखल होतील. मुर्मू यांच्यासोबत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू असतील.