मुंबई - गेल्या काही दिवसांपासून एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज नवे आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी समीर वानखेडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यांच्यात तब्बल तासभर चर्चा ही केली. समीर वानखेड यांनी त्यांचे संपूर्ण कौटुंबिक प्रकरण मला सांगितलं. त्यांचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार झाला होता. त्यांचे दस्तावेजही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही. ते अनुसूचित जातीमधील महार जातीचे असल्याचं मला जाणवलं, असे हलदर यांनी सांगितले.
वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रासह अनेक कागदपत्रे तसेच एक निवेदनही हलदर यांना दिलं. वानखेडे यांनी सादर केलेले कागदपत्र पाहता प्रथमदर्शनी त्यांनी धर्मांतर केलं नसल्याचं स्पष्ट झाले असल्याचे हलदर यांनी सांगितले.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्षांनी समीर वानखेडेंची घेतली भेट आपण अंमली पदार्थांच्या विरोधात काम करत आहोत. त्यामुळेच काही लोक मला जातीच्या आधारावर लक्ष्य करत आहेत. काही लोक माझ्यावर जाणूनबुजून आरोप करत आहेत, असे वानखेडे यांनी सांगितल्याचे हलदर यांनी म्हटलं. काही लोक वानखेडे कुटुंबावर जातीवरून हल्ला करत आहेत. त्याबद्दल वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही अनुसूचित जातीच्या आहात का ? असं मी वानखेडेंना विचारलं असता त्यांनी हो म्हणून सांगितलं व काही पुरावेही सादर केले, असेही हलदर यांनी सांगितले.
समीर वानखेड यांनी त्यांचे संपूर्ण कौटुंबिक प्रकरण मला सांगितलं. त्यांचा विवाह विशेष विवाह कायद्यानुसार झाला होता. त्यांचे दस्तावेजही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही. ते अनुसूचित जातीमधील महार जातीचे असल्याचं मला जाणवलं, असे हलदर यांनी सांगितले.
हेही वाचा -राज्यातील आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे - आरोग्य संचालक