महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रिमंडळासाठीचे सर्वाधिकार शरद पवार यांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केला ठराव - Nationalist Congress Party Meeting

राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात कोणती खाते मिळतील आणि त्यासाठीचे सर्वधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देण्याचा ठराव या बैठकीत आमदरांनी केला. या बैठकीला अजित पवार अजित पवार उपस्थित होते.

ncps-mlas-decided-to-give-sharad-pawar-all-the-power-for-the-cabinet
मंत्रिमंडळासाठीचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्यात आले.

By

Published : Nov 27, 2019, 5:54 PM IST

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात कोणती खाते मिळतील आणि त्यासाठीचे सूत्र काय असेल हे ठरवण्याचे सर्वाधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्याचा महत्त्वाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी एका बैठकीत घेतला.

मंत्रिमंडळासाठीचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्यात आले.

सकाळी विधानसभेतआमदारकीची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. या बैठकीत आमदारांनी मंत्रिमंडळ आणि त्या संदर्भातील सर्वाधिकार हे शरद पवार यांना असतील असा ठराव संमत केला, या ठरावाला एकमताने मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे या बैठकीला कालच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ सुनील तटकरे धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित होते. या बैठकीत सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार आणि मंत्र्यांच्या कामकाजाच्या संदर्भात काही दिशादर्शक असे मार्गदर्शन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले. आमदारांनी आपले कामकाज करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अजित पवार यांच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की ते आमचे नेते आहेत आणि पुढेही राहणार आहेत, त्यामुळे बैठकीला उपस्थित होते. त्यांनी आमदारांना मार्गदर्शन ही केले.

ही बैठक सुरू होण्यापूर्वी अजित पवार समर्थकांनी या ठिकाणी एकच वादा अजित दादा नावांच्या जोरदार घोषणा करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. ' एकच वादा अजित दादा अशा घोषणा करत अजित पवार यांचे आगमन झाल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष केला. अजित पवार यांचे समर्थन या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details