मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी हॉटेल ट्रायडंटच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन - UP CM Yogi Adityanath
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर निदर्शने करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ट्रायडनट हॉटेल बाहेर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधातल्या घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यात आणि पोलिसांच्यात वादावादी पाहायला मिळाली. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर, वातावरण तापले; मनसे, शिवसेना, काँग्रेसकडून लक्ष्य
Last Updated : Dec 2, 2020, 3:00 PM IST