महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP On Shivbhojan Thali : शिवभोजन थाळी बंद केल्यास आंदोलन करणार, राष्ट्रवादीचा इशारा

कोरोनाच्या काळात जेव्हा उपहारगृह बंद होती, लोकांचा रोजगार बंद होता, रोजंदारी बंद होती त्याकाळात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पोटाची भूक भागवता यावी या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी उपक्रम (Shivbhojan Thali in State) राज्यभर राबवला होता. त्यामुळे गरीबांची ही शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय (decision taken of closing Shivbhojan Thali) केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून विरोध करेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. (NCP oppose close Shivbhojan Thali)

शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांचा आंदोलनाचा इशारा
शिवभोजन थाळी बंद केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांचा आंदोलनाचा इशारा

By

Published : Sep 27, 2022, 4:26 PM IST

मुंबई : कोरोनाच्या काळात जेव्हा उपहारगृह बंद होती, लोकांचा रोजगार बंद होता, रोजंदारी बंद होती त्याकाळात महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पोटाची भूक भागवता यावी या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीने शिवभोजन थाळी उपक्रम (Shivbhojan Thali in State) राज्यभर राबवला होता. त्यामुळे गरीबांची ही शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय (decision taken of closing Shivbhojan Thali) केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस कडाडून विरोध करेल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. (NCP oppose close Shivbhojan Thali)


घरकामगार, फेरीवाल्यांना शिवभोजन थाळीचाच आधार -शिवभोजन थाळीच्या माध्यमातून लाखो गरीब व सर्वसामान्य लोकांना अतिशय अल्पदरात स्वादिष्ट व पौष्टिक थाळी देण्यात आली होती. घरकामगार, फेरीवाले, रिक्षावाले अशा लाखो लोकांसाठीच शिवभोजन थाळीची संकल्पना महाविकास आघाडीने मांडली असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले ईडीसरकार ठाकरेसरकारच्या सर्व योजनांचा फेरआढावा घेत सर्वसामान्यांची शिवभोजन थाळी बंद करण्याच्या किंवा त्याच्यात कपात करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिंदे सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्यास किंवा कुठलीही कपात केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

गोरगरिबांसाठी मोफत थाळी -शिवभोजन थाळीत भाजी, चपाती, दाळ आणि भात असे सात्त्विक जेवण दिले जाते. शिवभोजन थाळीची योजना सुरू केली तेव्हा एका थाळीची किंमत 10 रुपये दर निश्चित केला होता. मात्र, त्यानंतर लगेचच हे दर कमी करून 5 रुपये केले होते. पुन्हा हे दर पूर्वीप्रमाणे 10 रुपये झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर 30 मार्चपासून हे दर परत 5 रुपये झाले होते. आता कडक निर्बंध असल्याने राज्य शासनाने गोरगरिबांचा विचार करून थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तो मागेही घेतला जाऊ शकतो.

शिवभोजन थाळींची संख्या मर्यादित -जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. त्या माध्यमातून एका दिवसात सकाळी व रात्री मिळून सुमारे साडेतीन हजार थाळींचे वितरण करण्याची मर्यादा आखून देण्यात आली आहे. आता कडक लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरीब लोक शिवभोजन थाळीवर अवलंबून आहेत. परंतु, थाळी मर्यादित असल्याने एकूण मागणी आणि प्रत्यक्ष उपलब्ध होणाऱ्या थाळी यांच्या संख्येत खूप फरक आहे. त्यामुळे अनेकांना शिवभोजन केंद्रांवरून निराश होऊन उपाशी पोटीच माघारी फिरावे लागत आहे.


जळगावात सर्वच केंद्रांवर थाळीचा तुटवडा -जळगावात देखील ठिकठिकाणी शिवभोजन केंद्र आहेत. मात्र, सर्वच केंद्रांवर जेवणाच्या थाळीचा तुटवडा जाणवत आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे मालधक्काजवळ असलेले केंद्र तसेच इतर ठिकाणी असलेल्या केंद्रांवर थाळी संपल्या होत्या. अनेकांना रिकाम्या हाती परत जावे लागले. राज्य शासनाने थाळींची संख्या वाढवली पाहिजे, अशी मागणी गोरगरिब नागरिक करत आहेत. दरम्यान, कडक निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांव्यतिरिक्त इतरांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. अशा परिस्थितीत शिवभोजन केंद्रावर जेवणाची थाळी घेण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलीस कारवाईची भीती आहे. याचाही विचार राज्य शासनाने करायला हवा, अशी अपेक्षा देखील नागरिक व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details