मुंबई - महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ६ ऑगस्टला सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पूर आल्याने नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथे स्थगित केली होती. यानंतर पक्षाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात येत होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पूरग्रस्तांच्या भेटी घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा १९ ऑगस्टपासून पुन्हा होणार सुरू
महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्रात पुरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
आता पूरस्थिती निवळल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू होत आहे. पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे.
२६ ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालणार असून, पुढील तारखा लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.