महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#MaharashtraGovtFormation: अजित पवारांकडे 54 आमदारांच्या सह्यांचा कागद; शरद पवारांना संशय - MaharashtraPolitics

सकाळपासून राज्यभरात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. आम्हाला काही कळण्याआधीच भाजपचे नेते आले आणि शपथविधी पार पडला, असे शपथविधीला उपस्थित असणारे आमदार शिंगणे म्हणाले.

#MaharashtraGovtFormation LIVE

By

Published : Nov 23, 2019, 12:21 PM IST

Updated : Nov 23, 2019, 2:27 PM IST

मुंबई - देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर राज्यभरात राजकीय भूकंप झाल्याचे चित्र आहे. यानंतर शरद पवार यांनी ट्वीट केले. अजित पवारांनी घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांची संयुक्त प्रकार परिषद होत आहे. अनेक राजकीय घडामोडींचा खुलासा यामध्ये होणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या या बैठकीत तीनही पक्षातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • गरज पडल्यास आमदारांना हॉटेलवर ठेवणार - पवार
  • पक्षाविरोधात जाणूनबुजून कृत्य केलेल्यांवर कमिटी 'योग्य तो' निर्णय घेईल; परंतु, जे अनभिज्ञ त्यांच्यावर कारवाईची गरज नाही - शरद पवार
  • आमचं राजकारण म्हणजे टीव्हीच्या मालिका नाहीत ; 'रात्रीस खेळ चाले' - उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्रावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सत्ताधारी भासवत आहेत - ठाकरे
  • 'फर्जिकल स्ट्राईक'; हा फर्जी स्ट्राईक - ठाकरे
  • काही झाले तरी आम्ही तिनही पक्ष एकत्र राहणार - पवार
  • अजित पवारांकडे 54 आमदारांच्या सह्यांचा कागद; शरद पवारांना संशय
  • आम्हाला काही कल्पना नव्हती...अजित पवारांनी बोलवल्याने आम्ही गेलो - नवनिर्वाचीत आमदार
  • आम्हाला काही कळण्याआधीच भाजपचे नेते आले आणि शपथविधी पार पडला - शपथविधीला उपस्थित आमदाराची माहिती
  • सिंदखेडचे आमदार शिंगणे या शपथविधीला उपस्थित - पवारांची माहिती
  • 10 ते 11 सदस्य अजित दादांच्या कृत्यात सहभागी- शरद पवार
  • अजित पवारांचा निर्णय पक्षाच्या धोरणाविरोधात - शरद पवार
  • सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंचे केले स्वागत
  • सभागृहाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या अजित पवारांविरोधात घोषणा
  • 'अजित पवार मुर्दाबाद' च्या घोषणा देऊन कार्यकर्त्यांकडून रोष व्यक्त
  • तिन्ही पक्षांचे नेते यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल
Last Updated : Nov 23, 2019, 2:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details