महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mulayam Singh Yadav Demise : माझे शुभचिंतक आमच्यातून निघून गेले, मुलायम सिंहाच्या निधनावर शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख !

मुलायम सिंग यांची प्रकृती अनेक दिवसांपासून बरी नव्हती. माझे आणि त्यांचे वय एकच होते. त्यांची विचारधारा राम मनोहर लोहियांसारखी होती. आजही तीच विचारधारा घेऊन ते चालत होते. केंद्र सरकारमध्ये आणि विरोधात अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आम्हाला सोबत घेऊन चांगलं काम केलं, मुलायम सिंह माझे जुने शुभचिंतक होते, ते आमच्यातून निघून गेले, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलायम सिंह यांच्या निधनानंतर शोक व्यक्त ( NCP Sharad Pawar expressed grief over the death of Mulayam Singh Yadav ) केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

NCP Sharad Pawar expressed grief over the death of Mulayam Singh
माझे शुभचिंतक आमच्यातून निघून गेले, मुलायम सिंहाच्या निधनावर शरद पवारांनी व्यक्त केलं दुःख

By

Published : Oct 10, 2022, 2:06 PM IST

मुंबई : मुलायम सिंग यांची प्रकृती अनेक दिवसांपासून बरी नव्हती. माझे आणि त्यांचे वय एकच होते. त्यांची विचारधारा राम मनोहर लोहियांसारखी होती. आजही तीच विचारधारा घेऊन ते चालत होते. केंद्र सरकारमध्ये आणि विरोधात अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आम्हाला सोबत घेऊन चांगलं काम केलं, मुलायम सिंह माझे जुने शुभचिंतक होते, ते आमच्यातून निघून गेले, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर शोक व्यक्त ( NCP Sharad Pawar expressed grief over the death of Mulayam Singh Yadav ) केला. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

देशाचे खूप मोठं नुकसान- मुलायम सिंह यादव यांनी उत्तर प्रदेश मध्ये विरोधी पक्षनेते तसेच मुख्यमंत्री म्हणुन चांगल काम केलं. पार्लमेंट मध्ये झुंजार खासदार म्हणुन त्यांनी काम पाहिल होतं. भारत सरकारमध्ये त्यांनी चांगल काम केलं होतं. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. ती पूर्ण होण्यापूर्वी त्यांचं निधनाने देशाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

समाजवादी चळवळीची धारणा - आम्हीं संसदेत एकत्र काम केले, आमच्यामध्ये दुवा होता तो म्हणजे चंद्रशेखर यांचा. मुलायम सिंग यांची आणि माझी एनर्जी सारखीच होती. समाजवादी चळवळ सुरु राहिली पाहिजे, अशी मुलायम सिंग यांची धारणा होती.



अजित पवार यांनी केलं दुःख व्यक्त - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने समाजातील सर्व दुर्लभ घटकांना सोबत घेऊन जाणारा आणि समाजवादी चळवळीला पुढे घेऊन जाणारा नेता हरपला, अशा शब्दात राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून भावना व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details