महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vedanta Group and Foxconn issue : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राष्ट्रवादीचे ट्विटरच्या माध्यमातून उत्तर - Union Minister Narayan Rane criticized NCP

वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन समूहाच्या माध्यमातून राज्यामध्ये होणारे मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारवर मोठी टीका झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका ( Union Minister Narayan Rane criticized NCP ) करत, शरद पवार यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत महाराष्ट्राला उद्योगात प्रगतीपथावर का नेलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. नारायण राणे यांच्या या प्रश्नाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून उत्तर देण्यात आलं ( NCP reply to Union Minister Narayan Rane ) आहे.

NCP President Sharad Pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

By

Published : Sep 16, 2022, 1:40 PM IST

मुंबई -वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉन समूहाच्या माध्यमातून राज्यामध्ये होणारे मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्य सरकारवर मोठी टीका झाली आहे. याबाबत काल केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीशरद पवारयांच्यावर टीका ( Union Minister Narayan Rane criticized NCP ) करत, शरद पवार यांनी आपल्या मोठ्या कारकिर्दीत महाराष्ट्राला उद्योगात प्रगतीपथावर का नेलं नाही? असा प्रश्न उपस्थित केला होता. नारायण राणे यांच्या या प्रश्नाला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून उत्तर देण्यात आलं ( NCP reply to Union Minister Narayan Rane ) आहे.

राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओतून कार्याचा आढावाराष्ट्रवादीच्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ जारी करण्यात आले असून, शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्या विकासासाठी नेमकं काय काय केलं ? त्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचा औद्योगिक महत्त्व तर वाढवलं, त्यासोबतच कृषी क्षेत्रात भरीव काम केलं. अनेक शहरांचा कायापालट केला. एवढेच नाही, तर क्रीडा क्षेत्रही कसं पुढे जाईल ? यासाठी प्रयत्न केले असल्याचे व्हिडिओतून सांगण्यात आला ( NCP reply through Twitter ) आहे.



लहान मुलाची समजूत काढल्यासारखं मुख्यमंत्र्यांची समजूत काढलीवेदांता ग्रुपचा प्रकल्प ( Vedanta Group and Foxconn issue ) राज्याबाहेर गेल्यानंतर शरद पवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली. मात्र आता हा प्रकल्प जरी बाहेर गेला असला तरी, इतर महत्त्वाचे प्रकल्प राज्यात कसे येतील ? याबाबत आता राज्य सरकारने लक्ष घातलं पाहिजे. तसेच वेदांता ग्रुप यांच्या प्रकल्प पेक्षाही मोठा प्रकल्प पंतप्रधान राज्य सरकारला देईल, हे मुख्यमंत्र्यांचे वाक्य म्हणजे लहान मुलाची समजूत काढण्यासारखं असल्याचा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details