मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर (Sharad Pawar recovered from corona ) मात केली आहे. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी ट्विट करून माहिती दिली. आपल्याला कोरोना झाल्यानंतर आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद शरद पवार यांनी मानले आहेत.
हेही वाचा-Students Demand Cancellation of Board Exams : बोर्डाच्या परीक्षा रद्द करा, दहावी-बारावीच्या मुलांचे पुण्यात आंदोलन
उत्तर प्रदेश आणि गोवा येथे शरद पवार प्रचारासाठी जाण्याची शक्यता-
24 जानेवारीला शरद पवार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ( Sharad Pawar corona negative report ) आला होता. त्यानंतर शरद पवार यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तसेच त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांचे पुढील कार्यक्रम नियमित होतील अशी माहितीही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यावेळी दिली. त्यामुळे शरद पवार यांचा कोरोना रिपोर्ट नेगेटिव्ह आल्यामुळे उत्तर प्रदेश आणि गोवा येथे शरद पवार प्रचारासाठी जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: ट्विट करुन कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी स्वत:ची करोना चाचणी करुन घ्यावी, अशी विनंतीही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये केली होती.
हेही वाचा-Shiv Sena Support to Utpal Parrikar : शिवसेनेचा उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा; पणजीमधून घेतला उमेदवार मागे, राऊत म्हणाले...