महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#CAA #NRC आणि #NPR विरोधात २४ जानेवारीला महारॅली; शरद पवार करणार नेतृत्व - dadar

केंद्र सरकारने पारित केलेले CAA, NRC आणि NPR कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष एकवटलेले दिसत आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्व डावे पुरोगामी पक्ष आणि संघटना या कायद्यांच्या विरोधात एकत्रित विरोध करण्याच्या तयारीत आहेत.

NCP president Sharad Pawar will lead the protest march
सीएए एनआरसी आणि एनपीआर विरोधातील महारॅलीचे शरद पवार करणार नेतृत्व

By

Published : Jan 10, 2020, 7:33 PM IST

मुंबई -राज्यात येत्या २४ जानेवारीला दादरच्या हुतात्मा बाबू गेनू कामगार स्टेडियमवर सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात महारॅली आयोजित करण्यात आली आहे. या महारॅलीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. त्यासोबत या रॅलीत देशभरातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. त्यासाठी त्यांना निमंत्रण देण्यासाठीचा निर्णय घेण्याकरिता, शुक्रवारी मुंबईत विविध पक्ष आणि काही संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

सीएए एनआरसी आणि एनपीआर विरोधातील महारॅलीच्या नियोजनासाठी मुंबईत बैठक...

हेही वाचा... चंदा कोचर यांची ७८ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीकडून मनीलाँड्रिगप्रकरणी कारवाई

मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, लोक भारती, सीपीआय, सीपीएम, जनता दल सेक्युलर, बीआरएसपी, राष्ट्र सेवा दल, भटके विमुक्त समाज, कामगार संघटना आणि विद्यार्थी संघटना यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे निमंत्रक आमदार कपिल पाटील आणि आमदार किरण पावसकर यांनी याबाबात माहिती दिली.

हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

देशात या नव्या कायद्याने आदिवासी, भटके विमुक्त, लिंगायत आणि मुस्लिम यांच्यासह इतरही लोक बाधित होणार आहेत. देशातील ३० टक्क्यांहून अधिक समाजाला नोटबंदीपेक्षा अधिक मोठ्या जाचाला सामोरे जावे लागणार आहे. हा प्रश्न कोणत्या जाती समुहाचा नसून भारतीय नागरिकत्वाचा आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व भारतीयांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या विरोधात लढाईला सज्ज व्हावे, असे आवाहन आजच्या बैठकीत करण्यात आले.

हेही वाचा... जळगावात भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा; दानवे, महाजनांवर फेकली शाई

कोणत्याही पक्षाचा झेंडा न वापरता देशाचा तिरंगा हातात घेऊन 'हम भारत के लोग' या नावानेच हे आंदोलन सुरू ठेवण्यास राजकीय पक्षांनी संमती दिली. राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांच्या पुढाकाराने अलीकडेच देशभरातील विचारवंत व अ‍ॅक्टिव्हीस्ट एकत्र आले होते. त्यावेळी 'हम भारत के लोग' या नावाने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय झाला होता.

हेही वाचा... समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला 'छपाक', काँग्रेसने दिला पोस्टर सपोर्ट

आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत लोक भारतीचे आमदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार किरण पावसकर, काँग्रेस पार्टीचे एकनाथ गायकवाड व सचिन सावंत, समाजवादी पार्टीचे मिराज सिद्दीकी, सीपीआयचे प्रकाश रेड्डी, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त व अंजुमने इस्लामचे चेअरमन डॉ. जहीर काझी, बीआरएसपीचे अॅड. सुरेश माने, सीपीएमचे डॉ. अशोक ढवळे, जनता दल सेक्युलरचे प्रभाकर नारकर, मलविंदसिंग खुराणा, सीटीझन्स फोरम अगेन्स्ट NRC/NPR चे फारूक शेख, भटके विमुक्त समाज नेते डॉ. कैलास गौड, छात्र भारतीचे सचिन बनसोडे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details