महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल' - jayant patil

सध्या देशात भाजपची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचे, ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना समान अधिकार आहे. परंतु त्यांच्या मनात याबाबत शंका निर्माण केली जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Jan 23, 2020, 2:57 PM IST

मुंबई -समाजात फूट करण्याचे काम आजचे केंद्रातील भाजप सरकार करत आहे. या सरकारच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. त्यामुळे यावर आपल्याला विचार करावा लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज अल्पसंख्याक विभागाची बैठक राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यावेळी पवार बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... भारतीय राज्यघटनेची ७० वर्षे : विकास, कलम ३७० आणि सीएए..

अल्पसंख्याक समाजाच्या अनेक समस्या आहे. या समाजाच्या समस्या सोडवायच्या आहेत. सध्या देशात भाजपची सत्ता आहे. समाजातील सर्व वर्गाला सोबत घेऊन जायचे, ही सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी असते. भारतातील सर्व लोकांना समान अधिकार आहे. परंतु, सरकारकडून त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

हेही वाचा... शिक्षा सुनावल्यानंतर ७ दिवसात अंमलबजावणी व्हावी, सरकारची सर्वोच्च न्यायालयात मागणी

पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंकेचा काही भाग आहे. जिथे भारतातील काही लोक राहतात. त्यांनाही आपल्या देशात परत यावे, असे वाटत असेल. तर तो त्यांचा अधिकार आहे. परंतु ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना ते मान्य नसल्याचेही शरद पवार म्हणाले. अल्पसंख्याक समाजातील लोकही मोठ्या प्रमाणावर भारतातून बाहेर गेली होती. त्यांना देश स्वतंत्र झाल्यावर परत यायचे आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा... गडचिरोलीमध्ये 18 आयएएस अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा

NRC, CAA यामुळे मुस्लीम समाजाला नजरअंदाज केले जात आहे. तर दुसरीकडे भटक्या विमुक्त जातिचे लोक आहेत. जे कामानिमित्त एका जागेवर राहत नाही. अशा लोकांचे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे त्यांनाही आपली ओळख दाखवावी लागणार आहे. त्यांना पुरावा द्यावा लागणार आहे. ही वेळ या भाजप सरकारने आणली आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'कँडीक्रश'चा खेळ भोवला, सहकार आयुक्त निलंबित

अल्पसंख्याक विभाग आमच्याकडेच हवा, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार नवाब मलिक यांना या खात्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते अल्पसंख्याक समाजासाठी काम करतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा... कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा

दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. ते व्यवस्थित कसे चालेल, हे पाहिले पाहिजे. सर्व जाती धर्मातील लोकांना न्याय देण्याचे काम आम्ही करणार आहे. परंतु काही बातम्या जाणूनबुजून पेरल्या जात आहे. त्या गोष्टीकडे लक्ष देवू नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी केले. तर, देशात आणि राज्यात अल्पसंख्याक विभाग आणि समाज मोठ्या प्रमाणात आहे. या युवकांना रोजगार देण्याचे काम आपले आहे. सत्ता आपल्याकडे आहे. त्यांच्यासाठी काम करायचे आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details