महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा 'प्लान बी' तयार, पोलिसांबरोबर झडप होण्याची भिती ? - मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड झाल्यास, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्लान बी तयार... मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता..!

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड झाल्यास, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्लान बी

By

Published : Sep 27, 2019, 10:44 AM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (शुक्रवार ) दुपारी इडीच्या कार्यालयात स्वत: जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. शिवाय शरद पवारांनीही कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.

पवारांनी नाही म्हटले असे तरिही, राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केल्यास, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्लान बी तयार केला असून, तसे झाल्यास मुंबईत मोठी वाहतूक कोंडी होवू शकते, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी ईटीव्ही भारत बरोबर बोलताना स्पष्ट केले.

हेही वाचा... 'ईडी'बाहेर हजारो कार्यकर्ते राहणार उपस्थित..राष्ट्रवादीकडून शक्तीप्रदर्शनाचे संकेत

राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांना रात्रीपासूनच ताब्यात घेतले गेले आहे. शिवाय मुंबईच्या वेशीवर पोलिस तैनात करून ठेवण्यात आले आहेत. दिसतील तिथे त्यांना ताब्यत घेण्याचे आदेश आहेत. असे झाले तर ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांना अडवले जाईल त्या ठिकाणीच धरणे आंदोलन, वेळ पडली तर रास्ता रोको करण्याची रणनिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आखली आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या वाहतूकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या दिशेने मुंबईत येता येईल त्या दिशेने कार्यकर्ते दाखल होणार आहे. रायगड आणि रत्नागिरीत कार्यकर्ते समुद्रमार्गे धडकणार असल्याची माहितीही मिळत आहे. काही कार्यकर्ते लोकल ट्रेनने ही ईडी कार्यालयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील.

हेही वाचा... आम्ही कायदा व सुव्यवस्था मानणारी लोक, ही दडपशाही योग्य नाही - नवाब मलिक

गटागटाने वेगवेगळ्या मार्गाने कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या दिशेने जाणार आहेत. गनिमी काव्याची भूमिका युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पत्करणार असून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ईडी कार्यालयाबाहेर दिसतील, असेही चव्हाण यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांनी दडपशाही करू नये, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांची आहे. तसे न झाल्यास पोलिस आणि कार्यकर्ते यांच्यात अनेक ठिकाणी झडप होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details