मुंबई -भाजपा शेतकरी मोर्चाबाबत काय विचार करते हा त्यांचा अधिकार आहे. आमचे सरकार दडपशाही करणारे नाही. म्हणून त्यांनी काय बोलावे, तो त्यांचा अधिकार आहे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त घाटकोपरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी रक्तदाते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.