महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राष्ट्रवादीचे संजय बनसोड पुन्हा पक्षाच्या संपर्कात - राष्ट्रवादीचे गायब आमदार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहिती मिलींद नार्वेकर यांना मिळाल्यावर त्यांची मनधरणी करून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांना संजय बनसोड यांना कारमध्ये बसवून सुरक्षित शरद पवार यांच्याकडे पोहचवण्यासाठी निघाले आहेत.

संजय बनसोड

By

Published : Nov 23, 2019, 7:18 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे गायब आमदार संजय बनसोड हे मुंबई एअरपोर्टजवळील सहारा हॅाटेलमध्ये होते. तेथून शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर हॅाटेल ललितमध्ये संजय बनसोड यांना आणून भाजपने केलेल्या अपहरण केले होते का, अशी विचारपूस केली. यानंतर पुन्हा त्यांना राष्ट्रवादीच्या ताब्यात देण्यात आले.

एकनाथ शिंदे आणि मिलींद नार्वेकर यांच्यासोबत संजय बनसोड


राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार संजय बनसोड यांची माहिती मिलींद नार्वेकर यांनी तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. त्यानंतर पवारांच्या सुचनेनुसार माजी आमदार शशिकांत शिंदे हॅाटेल ललितमध्ये आले आणि आमदार संजय बनसोड यांना सोबत घेऊन जाण्यास निघाले. मात्र, आमदारांच्या सुरक्षेसाठी स्वत: शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांनी संजय बनसोड यांना कारमध्ये बसवून शरद पवार यांच्या वाय. बी चव्हाण येथील बैठकीत हजर करण्यासाठी हॅाटेल ललितमधून निघाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details