मुंबई -राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या maharashtra Monsoon sessions पाचव्या दिवशी आज विधान भवनाच्या MLA Rada Vidhan Bhavan Mumbai पायऱ्यांवर सत्ताधारी व विरोध यांच्या जोरदार राडा झाला. दोन्ही बाजूनी घोषणाबाजी करत हे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र पाहायला भेटले. या गोंधळाला सर्वस्वी सत्ताधारी जबाबदार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी NCP MLA Amol Mitkari criticized government यांनी सांगितले आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी शिवीगाळ Shinde group MLA abused केली, धक्काबुक्की केली. यामुळे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर गोंधळ उडाला. अखेर अजित पवार Ajit Pawar Opposition Leader आले आणि आम्हाला बाजुला होऊया म्हणाले. त्यामुळे आम्ही बाजुला झालो, असे अमोल मिटकरी MLA Amol Mitkari यांनी म्हटले आहे.
पन्नास खोके एकदम ओके हा नारा दिल्याने शिंदे गटातील आमदारांना झोंबल्याने त्यानी हे कृत्य केले आहे. आम्ही त्यांना डिवचले नाही त्यांनीच आम्हाला डिवचले आहे. धक्काबुक्की करणारे आमदार कोण होते? त्यांना मी ओळखत नाही. आम्हाला अजितदादा पवार यांनी सभागृहाच्या पायऱ्यांवर बोलावले होते. त्यानुसार आम्ही आंदोलनासाठी आलो होते. परंतु जे काही अशोभनीय वर्तन केले आहे, ते संविधानाला धरून नाही, असे मिटकरींनी म्हटले आहे.