महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ncp minister jayant patil - दोन वर्षांनंतर भाजपची विरोधी पक्ष म्हणून काम करायला सुरुवात, मंत्री जयंत पाटलांचा टोला - BJP Opposition jayant patil comment

भारतीय जनता पक्षाने दोन वर्षांनंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला ते सुरुवात करतील. ही चांगली गोष्ट आहे, असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Ncp minister jayant patil) यांनी लगावला.

Ncp minister jayant patil
भाजप विरोधी पक्ष काम जयंत पाटील

By

Published : Nov 17, 2021, 6:46 PM IST

मुंबई -भारतीय जनता पक्षाने दोन वर्षांनंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केली आहे. आता राज्यातील जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडायला ते सुरुवात करतील. ही चांगली गोष्ट आहे, असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Ncp minister jayant patil) यांनी लगावला.

हेही वाचा -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांना मुंबई न्यायालयने केले फरार घोषित

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार, असे आवाहन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यावर जयंत पाटील यांनी हा टोला भाजपला लगावला आहे.

आघाडी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरा, फडणवीसांचे आवाहन

भारतीय जनता पक्षाच्या काल (16 नोव्हेंबर) झालेल्या कार्यकारणी बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारवर (maha vikas aghadi news) हल्ला चढवला. राज्य सरकार प्रत्येक मोर्चावर अपयशी ठरली आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, इंधन दरवाढ याबाबत आघाडी सरकारला कोणतेही घेणेदेणे नाही. केवळ भ्रष्टाचार करण्याचा एकच लक्ष्य महा विकास आघाडी सरकारचा आहे. राज्यात मुख्यमंत्री आहेत. मात्र, त्यांना कोणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात अंतिम लढाई लढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केल आहे.

हेही वाचा -परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या याचिकेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून

ABOUT THE AUTHOR

...view details