महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यसभा निवडणूक : अतिरिक्त मत संजय पवार यांना देण्याच्या शरद पवार यांच्या सूचना - rajyasabha election 2022

राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकची मते राज्यसभा निवडणुकीसाठी उर्वरित ११ मते शिवसेनेच्या संजय पवार यांना द्या, अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत.

ncp
राष्ट्रवादीची बैठक

By

Published : Jun 2, 2022, 10:18 PM IST

मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकची मते राज्यसभा निवडणुकीसाठी उर्वरित ११ मते शिवसेनेच्या संजय पवार यांना द्या, अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत. तसेच आघाडीसंदर्भात समस्या असल्यास शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन समजून घ्या, असेही सांगण्यात आले आहे. मुंबईत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. दरम्यान, विविध विषयांवर चर्चा झाल्याचे राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राज्यसभेच्या विधानसभा नियुक्त रिक्त जागांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपने तीन उमेदवार देऊन महाविकास आघाडी आव्हान दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणविना होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक घेऊन काँग्रेस आणि शिवसेनेसोबत १४ महापालिका काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चा करा. मुंबई महापालिकेसाठी विभागवार बैठका घ्या. मंत्र्यांनी महापालिका निवडणुका असलेल्या ठिकाणी जनता दरबार घ्यावेत, अशा सूचना पवार यांनी दिल्या आहेत.

बिहारमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन जातनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. नितीशकुमार यांनी त्यामध्ये आघाडी घेतली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यासंदर्भात पुढाकार घ्यावी, अशी चर्चा करण्यात आल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३४० मध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, असे म्हणणे आहे. त्यानुसार आरक्षणासंदर्भातील आलेल्या अडचणींमुळं जातनिहाय जनगणना करणे आवश्यक असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details