मुंबई- राज्यात सध्या सत्ता स्थापनेचे नाट्य जोरात सुरू आहे. अजित पवार यांनी सकाळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे 50आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीत 50 आमदार उपस्थित; राजकीय घडामोडींना वेग - ajit pawar news
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. सध्या राष्ट्रवादीच्या विधीमंडळाची बैठक वायबी चव्हाण सेंटरमध्ये सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीचे 42 आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादी
दरम्यान, राष्ट्रवादीची बैठक सुरू असून या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळें याचबरोबर गायब असलेले धनंजय मुंडे हेदेखील हजर आहेत. या बैठकीआधी खासदार सुनील तटकरे, आमदार दिलीप वळसे पाटील व हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांची भेट घेतली होती.
Last Updated : Nov 23, 2019, 8:09 PM IST