मुंबई :शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. या पार्श्वभूमीवर त्यांची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राऊतांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडेही उपस्थित होते. तसेच, राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊतही यावेळी उपस्थित होते.
संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात नुकतीच अँजिओप्लास्टी नावाची एक छोटी सर्जरी झाली. कालच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारणा केली. यावेळी राऊत यांच्या आईंचीसुद्धा भेट घेत अनेक कौटुंबिक गप्पाही या नेत्यांनी केल्या, असे सांगण्यात येत आहे.