महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar on Assembly Election : राष्ट्रवादी तीन राज्यात निवडणूक लढवणार, यूपीत सपाशी युती - गोव्यात कॉंग्रेस तृणमुल कॉंग्रेस राष्ट्रवादीची युती

नुकतेच निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च 2022 च्या दरम्यान निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. आज ( मंगळवार ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण तीन राज्यात निवडणूक लढवणार ( Sharad Pawar on Assembly Election ) असल्याचे सांगितले आहे.

Sharad pawar on asembaly election
शरद पवार

By

Published : Jan 11, 2022, 4:24 PM IST

Updated : Jan 11, 2022, 7:24 PM IST

मुंबई : नुकतेच निवडणूक आयोगाने पाच राज्यामध्ये फेब्रुवारी ते मार्च 2022 च्या दरम्यान निवडणुका होणार असल्याचे जाहीर केले आहे. आज ( मंगळवार ) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण तीन राज्यात निवडणूक ( Sharad Pawar on Assembly Election ) लढवणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी काँग्रेस पक्षात 40 वर्ष कार्यरत असलेले सिराज मेहंदी यांनी राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.

शरद पवार पत्रकार परिषदेत माहिती देताना
  • यूपीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार -

देशाचं लक्ष लागून असलेल्या उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशात परिवर्तन होणार आहे. यूपीच्या लोकांना बदल हवा आहे. उत्तर प्रदेशात आणखी 13 आमदार भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत. उत्तर प्रदेशची निवडणूक ही प्रामुख्याने भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यातच लढली जाणार असल्याचं अनेक सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. आता या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत युती करणार असल्याची ( NCP president on up assembly Election )घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. ते म्हणाले की, "उत्तर प्रदेशमध्ये लोकांना आता बदल हवा आहे. समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी आणि इतर सहकारी पक्षांची युती हा लोकांसाठी पर्याय आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता आपल्याला पाठिंबा देईल."

  • मणिपूरमध्ये पाच जागा लढवणार -

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाग घेण्याचं ठरवलं आहे. तीन राज्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभा करणार आहे. मणिपूरमध्ये मणिपूरात चार राष्ट्रवादीचे आमदार होते, तिथे आता काँग्रेस सोबत पाच जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार आहे.

  • 'गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न'

गोव्यात महाविकास आघाडीचे प्रयत्न करणार आहे. कॉंग्रेस आणि तृणमुल कॉंग्रेस सोबत चर्चा सुरू आहे. गोव्यात भाजपा सरकार हटवण्याची गरज असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

  • पंतप्रधान व्यक्ती नसून एक संस्था -

पंतप्रधान ही एक संस्था असून पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांची असते. पंजाब मध्ये कोणत्या प्रधानाच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी सुरू आहे. मात्र पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसकडून केली जाणारी वक्तव्य योग्य नसल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

एसटी संघटनांच्या सदस्यांनी चर्चेला बोलावले -

अधिकार नसतानाही शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सोबत चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चार्ज शरद पवारांकडे दिला आहे का? अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आला. याबाबत शरद पवार यांच्याकडून स्पष्टीकरण देत, एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेले दोन महिने सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यास या बाबतीत चर्चा करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी बोलवलं. लोकशाहीमध्ये कोणीही चर्चा करू शकतो. मात्र चर्चा का केली असे भाजपचे नेते बोलत असतील तर ते त्यांचे अज्ञान असल्याचं उत्तर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले. तसेच राज्याचे निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री सक्षम आहेत. काल झालेल्या बैठकीच्या चर्चेबाबत देखील परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर माहिती देण्यात आली असेल असे शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने सोबत केलेल्या बैठकीबाबत सांगितले.

हेही वाचा -ST Workers Strike : 'निदान मुख्यमंत्र्यांचं तरी ऐका!'; एसटी संपावरून गोपीचंद पडळकरांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

Last Updated : Jan 11, 2022, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details