महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar meeting with NCP leaders : शिवसेनेतील बंडखोरीने सरकार अस्थिर, राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्वाची बैठक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार अस्थिर झाले असून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची ( Sharad Pawar meeting with NCP leaders ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत या ( NCP meeting yb center mumbai ) पार्श्वभूमीवर आज मुंबईत वाय.बी. सेंटरला महत्वाची बैठक होणार आहे.

Sharad Pawar meeting with NCP leaders
राष्ट्रवादी बैठक शरद पवार मुंबई

By

Published : Jun 23, 2022, 7:21 AM IST

Updated : Jun 23, 2022, 9:04 AM IST

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने सरकार अस्थिर झाले असून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची ( Sharad Pawar meeting with NCP leaders ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत या ( NCP meeting YB center Mumbai ) पार्श्वभूमीवर आज सकाळी अकरा वाजता मुंबईतील वाय.बी. सेंटरला महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीत पवार काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा -Uddhav Thackeray On Hindutva : हिंदूत्वावरुन शिवसेनेवर होणाऱ्या टिकेवर उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती; म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रणनीती आखण्यासाठी शरद पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले शासकीय निवासस्थान सोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजी असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. काल सायंकाळी शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी वर्षा निवासस्थानी भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली होती. शिवसेनेमध्ये या प्रकारचे बंड होऊ शकते, अशी शक्यता गृहमंत्र्यांनी गेल्या दोन ते तीन महिन्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्तवली होती.

मविआ सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठून बंड पुकारले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत युती करण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. सुरुवातीला शिंदे समर्थकांची संख्या २३ होती. हा आकडा जवळपास ५२ पर्यंत पोहचला आहे. शिंदे समर्थकांची संख्या वाढल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे यांचे बंड मोडून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकनाथ शिंदे आणि समर्थक आघाडीची साथ सोडण्यावर ठाम आहेत. सरकारचा डोलारा यामुळे डळमळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे, आजच्या बैठकीत शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी भावनिक आवाहन करूनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray) माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्षनेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सूचना दिली होती.

शिवसैनिक भावूक - सगळेच कार्यकर्ते कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचे प्रेम पाहून गलबलून गेले. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. त्यांनी शिवसैनिकांचे अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली आणि गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्याबरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.

शिवसैनिकांच्या गगनभेदी घोषणा - मुख्यमंत्री रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी उपस्थिती होती. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. शिवसैनिकांचे प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आले.

हेही वाचा -Complaint against Cm Thackeray : कोविड गाइडलाइन्सचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार

Last Updated : Jun 23, 2022, 9:04 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details