महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Silver Oak Attack : शंभराहून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक ( Sharad Pawar Bungalow Silver Oak Attacked ) या निवासस्थानी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी हिंसक आंदोलनाचा प्रयत्न ( ST Workers Agitator ) केला. पवारांच्या बंगल्यावर चपला आणि दगडफेक करणाऱ्या शंभराहून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले ( ST Worker Agitator Arrested By Police ) आहे. पवारांच्या बंगल्यावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शंभराहून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शंभराहून अधिक आंदोलक पोलिसांच्या ताब्यात.. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

By

Published : Apr 8, 2022, 5:26 PM IST

मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या ( ST Workers Agitator ) संतप्त जमावाने चपला आणि दगडफेक केल्यानंतर ( Sharad Pawar Bungalow Silver Oak Attacked ) आझाद मैदानात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी मॉब कंट्रोल ड्रिल सुद्धा घेतली. याशिवाय आझाद मैदानातून एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे. सिल्वर ओक बंगल्यावर दगडफेक करणाऱ्या शंभर पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले ( ST Worker Agitator Arrested By Police ) आहेत.

100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना अटक-मागील पाच महिन्यापासून आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. यात एसटी कामगारांना पेंशन, ग्रॅज्यूटी व बोनस देण्याचे सरकारने जाहीर केले. परंतु याचबरोबर राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने या कामगारांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांना कामावर घेण्याचे आदेश देण्यात आले. तर विलीनीकरणाच्या बाबत न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे संयम सुटलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जोरदार धडक दिली. 'शरद पवार मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद' अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे. सिल्वर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संतप्त जमावाने चपला आणि दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज करत ताब्यात घेतलेले आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवळजवळ शंभर पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेले आहेत.

शरद पवारांच्या बंगल्यावरील आंदोलनानंतर आझाद मैदानात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



घरावर हल्ला म्हणजे महाराष्ट्र राज्यावर हल्ला :राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई प्रदेश अध्यक्ष अॅड. निलेश भोसले यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भोसले यांनी आपल्या फेसबुकवर पोस्टमध्ये म्हटले की, पवार साहेबांना Z दर्जाची सुरक्षा असताना, हे आंदोलक साहेबांच्या घरापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने दक्षिण मुंबई सारख्या सर्वात सुरक्षित ठिकाणी पोहचतात. त्याची भनक CID, IB, SB-1 सारख्या यंत्रनेला लागत नाही, ही गंभीर बाब आहे. संविधानिक मार्गाने केलेले आंदोलन असते. परंतु कट रचून केलेल्या कृतीला आतंकवादी कार्यवाही असे म्हणतात. पोलीस प्रशासनास विनंती आहे, मुंबईचा बिहार होऊ देऊ नका. ST कर्मचारी आंदोलकांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी व्हावी. कोणाच्या सांगण्याहून कायदा सुव्यवस्था हातात घेतली जात आहे, याची चौकशी होणे गरजेचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details