महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंगरी दुर्घटना: प्रशासन अन् सरकारच जबाबदार - सचिन अहिर - hill area

भाजप सरकारने मुंबईत ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मतदार संघ नाहीत, अशा मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच डोंगरी भागातील इमारत दुर्घटना झाली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला.

सचिन अहिर

By

Published : Jul 16, 2019, 5:03 PM IST

मुंबई - राज्यातील भाजप सरकार मुंबईत ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मतदार संघ नाहीत, अशा मतदारसंघातील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला.

इमारत दुर्घटनेबाबत माहिती देताना सचिन अहिर

बीडीडी चाळ आणि इतर इमारतींचा विकास करण्यासाठी सरकारला रस आहे. मात्र, ज्या विभागात अत्यंत जुन्या आणि मागील १०० वर्षापासूनच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी सरकार जाणीवपूर्वक चालढकल करत आहेत. त्यामुळेच आज डोंगरी भागातील इमारत कोसळून अनेकांचा नाहक बळी गेला असल्याचे अहिर म्हणाले.

डोंगरी आणि त्या परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भात सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. तसेच आम्ही देखील विधानमंडळामध्ये अनेकदा या विषयाविषयी बोलतो. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच आजची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेला संपूर्णपणे प्रशासन आणि सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने आता तरी जागे होऊन मुंबईतील सर्वच ठिकाणच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी नियोजन करावे आणि त्या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणीही अहिर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

ABOUT THE AUTHOR

...view details