महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Bail Application नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आजची सुुनावणी आत 29 ऑगस्टला - Nawab Malik Bail Application

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. Nawab Malik Bail Application त्यावर आज सुनावणी होणार होती. मात्र, नायमुर्ती राहुल रानडे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही सुनावणी पुढे ढकलली असून, ती आता 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक

By

Published : Aug 24, 2022, 4:06 PM IST

मुंबई -गोवावाला कंपाउंड आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. आज बुधवार दि. 24 ऑगस्ट रोजी कोर्टात सुनावणी होणार होती. परंतु, सुनावणी सुरू असतानाचं न्यायाधिश राहुल रोकडे यांची प्रकृती अचानक बिघडली. Malik Bail Application Hearing Postponed त्यामुळे आज होणारी सुनावणी स्थगित करण्यात आली. याप्रकरणी पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी होणार आहे.

या सुनावणीदरम्यान, नवाब मलिकांना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तीवाद ईडीच्यावतीने अतिरीक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी केला आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमची बहिण हसीना पारकरने कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडची जमीन बळकावली असा आरोप त्यांच्यावर आहे. नंतर नवाब मलिकांनी ती जमीन खरेदी केली असा आरोप मलिक यांच्यावर आहे. याच आरोपांखाली मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे.

हेही वाचा -Close AC Trains रेल्वेने प्रवाशांना नको असलेल्या AC लोकल त्वरित बंद कराव्यात -जितेंद्र आव्हाड

ABOUT THE AUTHOR

...view details