मुंबई- दिडोंरी मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांनी मोदींच्या मंत्रिमंडाळात आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर कोरोना आढावा घेत त्यांनी लसीकरणावर राजकारण करू नका, असे आवाहन केले होते. मात्र, राज्यासह देशातील परिस्थिती पाहिली असता, सर्वच लसीकऱण केंद्रावर लसींचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत. त्यामुळे केंद्राने आधी सुरुळीत लस पुरवठा करावा असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी लगावला आहे.
मलिक म्हणाले, लसीकरणाच्या बाबतीत आम्ही राजकारण करत नाही, सुरुवातीपासून आमची मागणी आहे, केंद्राने मोठे मोठे आकडे समोर ठेऊ नये, जी सत्य परिस्थिती आहेत ती राज्यापुढे ठेवावी. राज्यांना किती लस देणार आहात याची तारखेनुसार आकडेवारी दिली पाहिजे. मात्र, तसे न करता केंद्र सरकारकडून केवळ आश्वासन दिले जात आहे. लस पुरवठा केला जात नाही. त्यामुळे आता मुंबईतील लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. यासाठी केंद्राने केवळ घोषणा करू नये लस पुरवण्याचे नियोजन करावे, असे आवाहन मलिक यांनी केले.