मुंबई - मनी लॉड्रींग प्रकरणात राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात ( Nawab Malik Arrested ) आली आहे. ईडीने तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत, मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना आज ( शुक्रवार ) तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु असल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले ( Nawab Malik Admitted In JJ Hospital ) आहे.
नवाब मलिक यांच्या वकिलांनी ईडीच्या कोठडीदरम्यान तीन मागण्यासांठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ईडीच्या कोठडीच नवाब मलिकांना औषध आणि त्यांच्या घरातून जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच, चौकशीवेळी वकिलांना सोबत उपस्थित राहता येणार आहे.