मुंबई - "आ देखे जरा, किसमे कितना है दम" असे म्हणत अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Leader Nawab Malik) यांनी विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (BJP Leader Pravin Darekar) यांना आव्हान दिले आहे. काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर एक हजार कोटीचा अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर याबाबत दरेकर यांनी ट्विट करत दावा दाखल केला असून, या प्रकरणात उत्तर देण्यासाठी नवाब मलिक यांनी न्यायालयाकडून वेळ मागितला असल्याचे सांगितले.
'कुटुंबाची नाहक बदनामी'
भाजपा नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी हा दावा केला असून, याबाबत दरेकर यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटला नवाब मलिक यांच्याकडून उत्तर देण्यात आले आहे. कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणा(Cordelia Cruise Drug Case)त मोहित कंबोज आणि त्यांचे मेहुणे हे सहभागी असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्याकडून पत्रकार परिषदेतून लावण्यात आला होता. या आरोपामुळे आमच्या कुटुंबाची नाहक बदनामी झाली असून या विरोधात मोहित कंबोज यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
'चिड़िया चुग गई खेत'
अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत केलेला सकाळचा शपथविधी एक चूक होती, असे वक्तव्य प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis)यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर नवाब मलिक यांनी टोला लगावला असून "चिड़िया चुग गई खेत, अब पछताए का होय, सत्ता बिना रहा ना जाए !!!" असे ट्विट करत टीका केली आहे.