मुंबई - पायल रोहतगीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असून हा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांना जाणीव करून दिल्यानंतरही कोणती कारवाई होत नाही. मग काय महाराष्ट्र पेटायची वाट बघत आहात का? लवकरात लवकर तिच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पेटायची वाट बघत आहात का? पायल रोहतगीवर कारवाई कधी, राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल - नवाब मलिक
पायल रोहतगीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यामुळे तिच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असा इशारा नवाब मलिक यांनी सरकारला दिला आहे.
राज्यात वातावरण चिघळण्याची वाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहात आहेत का? मुख्यमंत्र्यांना या घटनेचे गांभीर्य लक्षात येत नसेल तर राज्यातील जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. पायल रोहतगीला महाराजांचा अपमान करण्यासाठी सोडली आहे का? महापुरुषांचा अपमान भाजप समर्थक वारंवार करत आहेत. हे सरकार या लोकांना प्रोत्साहन देत आहे. कुठेतरी त्यांची विचारसरणी वरचढ आहे. इतरांचे विचार बरोबर नाहीत आणि हे काम ते गेल्या ७० वर्षे करत आहेत. मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाणीपूर्वक अपमान करण्यात येत आहे, असा आरोप मलिक यांनी केला आहे.