महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP And MNS Twitter War : आम्ही मेलो तरी 'हे' सहन करणार नाही; मंत्री जितेंद्र आव्हाडांचा मनसेला इशारा - शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकरण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Shivshahir Babasaheb Purandare ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबाबत विवादित लिखाण केला असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एक होते. कादंबरीकार ब.मो.पुरंदरे ह्यांनी लिहले आहे. गोत्र एक कुणाचे असते, आम्ही विरोध केला तर आम्ही जातीयवादी. आम्ही मेलो तरी हे सहन करणार नाही, असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांच्याकडून करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

By

Published : Apr 15, 2022, 7:00 PM IST

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP and MNS ) आणि मनसेमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Housing Minister Jitendra Awhad ) यांनी ट्विट करत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ( Shivshahir Babasaheb Purandare ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्याबाबत विवादित लिखाण केला असल्याचे म्हटले आहे. शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब आणि दादोजी कोंडदेव ह्यांचे गोत्र एक होते. कादंबरीकार ब.मो.पुरंदरे ह्यांनी लिहले आहे. गोत्र एक कुणाचे असते, आम्ही विरोध केला तर आम्ही जातीयवादी. आम्ही मेलो तरी हे सहन करणार नाही, असे ट्विट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केलेले ट्विट
जेम्स लेन यांनी लिहिलेल्या पुस्तकात आक्षेपहार्य माहिती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिली असल्यामुळेच आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. याबद्दल आपल्याला कधीही दुःख नाही. उलट अभिमान असल्याचे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांनी 2003 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पत्र लिहून जेम्स लेन यांच्या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी केली असल्याचे पत्र मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी समोर आणले. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनंतर दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा राजकीय वाद सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details