मुंबई -राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज ( 3 जुलै ) झाली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना बंडखोरांचे उमेदवार राहुल नार्वेकर निवडून ( Rahul Narwekar Assembly Speaker ) आले. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी अभिनंदानाचे भाषण केले. यावेळी राज्यपालांना विरोधी पक्षाकडून चांगलेच टोले लगावण्यात आलं. महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे पाठवण्यात आली होती. ती बारा जणांची नियुक्ती राज्यपालांनी करावी. त्यातून राज्यपालांचा एक सकारात्मक संदेश राज्यात जाईल, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ( Jayant Patil Taunt Bhagatsingh Koshyari In Vidhan Sabha ) काढला.
जयंत पाटील म्हणाले की, गेले दीड वर्ष महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करत होतं. आम्हाला माहीत नाही ते कशाची वाट पाहत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर लगेच त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी परवानगी दिली. कदाचित ते सत्तापालट होण्याची वाट पाहत होते का?, असा टोलाही पाटील यांनी राज्यपालांना लगावला आहे.