मुंबई -राज्यामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका ( vidhan parishad election ) आघाडीमध्ये सामील असलेले सर्व पक्ष एकत्र मिळून लढवण्याचा सर्व पक्षाचा विचार आहे. मात्र एखादा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक लढवू इच्छित असेल, तर इतर उरलेले पक्ष एकत्र राहून निवडणूकीला सामोरे जातील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President of NCP Jayant Patil ) यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून काँग्रेसने राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढवाव्यात, असे पत्र लिहिले आहे. या पत्राबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
Vidhan Parishad Election 2021 : सर्व पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवण्याचा विचार - जयंत पाटील - स्वराज्य संस्था निवडणूक
एखादा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक लढवू इच्छित असेल, तर इतर उरलेले पक्ष एकत्र राहून निवडणूकीला सामोरे जातील, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( State President of NCP Jayant Patil ) यांनी व्यक्त केला आहे.
![Vidhan Parishad Election 2021 : सर्व पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढवण्याचा विचार - जयंत पाटील जलसंपदा मंत्री जयंत पाटील](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13732088-thumbnail-3x2-patil.jpg)
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
प्रतिक्रिया देतांना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
एसटी कर्मचारी हे आमचेच कर्मचारी आहेत. त्यांच्या अजूनही काही अडचणी असतील तर त्या देखील आम्ही समजून घेऊ. एसटी संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब पूर्णतः लक्ष घालून याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजूनही कर्मचाऱ्यांच्या मनात काही शंकाकुशंका असतील तर त्याबाबत माहिती घेत असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
Last Updated : Nov 25, 2021, 3:57 PM IST