मुंबई- राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याची ( NCP become numbe one party in MH ) प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil on NCPs victory in election ) यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत. जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा ( Rashtrawadi Pariwar Sanvad ) करून तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती.