महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'

"आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल." असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'
'पंतप्रधानांना बांग्लादेशात कोणत्या जेलमध्ये ठेवले होते?'

By

Published : Mar 29, 2021, 4:27 PM IST

Updated : Mar 29, 2021, 5:33 PM IST

मुंबई : बांग्लादेशच्या दौर्‍यावर असताना बांग्लादेश मुक्ती लढ्यात सहभागी झाल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच चिमटा काढला आहे. पंतप्रधानांना या लढ्यात नक्की कधी अटक झाली आणि कोणत्या तुरुंगात त्यांना ठेवण्यात आले होते याची माहिती त्यांनी द्यावी अशा शब्दांत पाटील यांनी पंतप्रधानांवर तिरकस निशाणा साधला आहे.

जयंत पाटील यांचे ट्विट

जयंत पाटील यांचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक ट्विट करत पंतप्रधानांना टोला लगावला आहे. "आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा! मात्र आपले पंतप्रधान बांग्लादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल." असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही युझर्सनी दिल्या आहेत.

काय म्हणाले होते मोदी?

बांग्लादेश मुक्ती लढ्यात आपण सहभागी झालो होतो. यावेळी आपण तुरुंगवासही भोगल्याचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांग्लादेश दौऱ्यातील भाषणादरम्यान केले होते. बांग्लादेश मुक्तीसाठी भारतीयही चांगलेच आग्रही होते. बांग्लादेशात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे अनेक दिवस आपण व्यथित होतो असेही मोदी म्हणाले होते.

नेटकऱ्यांकडून मीम्स व्हायरल

मोदींच्या या विधानावर सोशल मीडियातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या विधानाचा धागा पकडून तयार केलेले मीम्स सोशल मीडियातून चांगलेच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा -पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱ्यावर; राष्ट्रीय शहीद स्मारकाला दिली भेट

Last Updated : Mar 29, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details