मुंबई - शिखर बँक घोटाळ्यात शरद पवारांचा संबंध नसताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. कारण गेल्या १५ दिवसात पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद आहे. मात्र निवडणुकीची आचारसंहिता सुरू होताच ही कारवाई करणे लोकशाहीची गळचेपी आहे. कारण शरद पवारांचे नाव या प्रकरणात कुठेही नसतानाही कारवाई केली. त्यामुळे आमच्या तीव्र भावना असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
भाजपच्या डोक्यात सत्तेची मस्ती; भारताची लोकशाही धोक्यात - धनंजय मुंडे - धनंजय मुंडे
दरम्यान, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तसेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यावर प्रतिक्रिया बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर निशाणा साधला.
शरद पवार हे आज शिखऱ बँक घोटाळा प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल केल्या प्रकरणी दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. दरम्यान, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी ईडी कार्यालय परिसरात जमावबंदी लागू केली आहे. तसेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यावर प्रतिक्रिया बोलताना धनंजय मुंडेंनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपला सत्तेची मस्ती डोक्यात चढलीय. त्यामुळेच त्यांनी ईडीच्या माध्यमातून नेत्यांवर आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे विरोधक आवाज बंद करतील असे भाजपला वाटत असल्याचेही ते म्हणाले.
कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस आणि ईडीची आहे.. त्यांना जर कळाले असते तर त्यांनी अशा पद्धतीने कारवाई कशाला. मग ईडीने कारवाई कशा संदर्भात केली आहे. हे आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे. मात्र ईडीने कारवाई करायची आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थिती करायची ही लोकशाहीची गळचेपी आहे. तसेच आम्ही कोणताही कायदा हातात घेतला नसताना आमचया कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी करायचे धोरण या सरकारने सुरू केले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.