मुंबई- महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या कथित बांधकाम घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एसीबी न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट
छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त,
दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकामादरम्यान पैशांची अफरातफर केल्याच्या आरोपांवरून भुजबळ यांचे या प्रकरणात नाव आले होते. या प्रकऱणी भुजबळ यांना कारावासही भोगावा लागला होता. त्यानंतर भुजबळ यांची जामिनावर सुटका झाली होती. आता मुंबई न्यायालयाने आज त्यांना या महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी क्लीन चीट दिली आहे.