मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणीत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर विधानसभेत आमदारांना त्यांचे अभिनंदन केलं. विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातील अभिनंदनपर भाषण केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही जोरदार भाषण केलं. अभिनंदन भाषण करताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोमणे मारले आहे. फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. फार स्तुती तुम्ही शिंदे यांची करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते, तर 2014 साली रस्ते विकास खातेच का? दिले, असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला ( Ajit Pawar Speech In Maharashtra Assembly ) आहे. अजित पवार यांच्या भाषणातील 8 प्रमुख मुद्दे कोणते पाहुयात -
"सत्ता येते जाते" - फडणवीस तुम्ही आपल्या भाषणात सारखं-सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, असा उल्लेख करत आहात. फडणवीस यांना सारखं - सारखं एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत असे का?, सांगावं लागतं आहे. आज आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. लोकशाहीत हे चालत असतं. सत्ता येते असते जात असते. परंतु, फडणवीस तुमचं भाषण ऐकत होतो. फार स्तुती तुम्ही शिंदे यांची करत आहात. शिंदे सर्वगुणसंपन्न होते तर रस्ते विकास हेच खाते का? दिले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जनतेसाठी उपयोगी असणारे खाते एकनाथ शिंदे यांना का दिले नाही, असा सवाल अजित पवारांनी विचारला.
"राज्यपाल अॅक्शन मोडवर" - सध्या राज्यपाल अॅक्शन मोडवर आले आहेत, असा खोचक टोला लगावताना अजित पवार यांनी म्हटलं, नाना पटोले यांनी राजीनामान दिल्यावर सव्वा वर्ष परवानगी द्यावी म्हणून आघाडीच्या वतीने राज्यपालांकडे मागणी करत होते. मात्र, आता निवड ताबडतोब झाली. इतकी फास्ट घटना पाहायला मिळाली की त्यामुळे राज्यातील लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
"काय झाडी... आलं" - मिरच्या झोंबल्या पाहिजेत असे काहीतरी टाक असे संदीपान भुमरे बोलत असल्याची एक क्लीप बाहेर आली. भुमरे काय मिरच्या झोंबल्या पाहिजेत, अशी विचारणा करतानाच मग शहाजीबापूची काय झाडी... आलं... काय हे बापू... अशी टिपण्णी करताना ही मोठी डोकी कधी एकत्र येतील कळणार ही नाही. तुम्ही साधे आमदार आहात हे लक्षात घ्या, असेही टोलाही अजित पवारांनी बंडखोर आमदारांना लगावला आहे.
"सर्वात भाग्यवान देवेंद्र फडणवीस" -गेल्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस आधी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर विरोधी पक्ष नेते झाले आणि आता उपमुख्यमंत्री झाले. फक्त अडीच वर्षात अशी महत्त्वाची तीन पदे भूषवणारा व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून आपण त्यांना भाग्यवान समजतो, असा चिमटा फडणवीसांना अजित पवारांनी काढला आहे.