मुंबई -सध्या सोशल मिडीयावर अमित शाह (Amit shah), शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या भेटीचा फोटो गाजत आहे. यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. यावरून महाराष्ट्रातील नेते दिल्लीला जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हातातील कामे सोडून शरद पवार दिल्लीला गेल्याने त्या चर्चांमध्ये अजूनच भर पडली आहे.
यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून या प्रकरणावर खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून 'अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या गजाल्या सुरू झाल्या आहेत. त्यासाठी असले मॉर्फ केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटो शॉप जल्पकांना (मॉर्फस्) यांना शोझणे अवघड नाही. असे सांगत त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलला हे मॉर्फ केलेल्यांना शोधून काढण्याचे आवाहन केले आहे.
'महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे केले होते भाकीत'
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडमोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, ;महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही. मात्र, मार्चपर्यंत तेथे भाजपचे सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर अपेक्षित बदल दिसून येतील. सरकार पाडणे आणि स्थापन करणे हे गुपित असून ते माझ्यात आहे, मला ते बाहेर काढायचे नाही,' असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.
'राजकारणातील भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायण राणे यांनीच घेतलाय' - खासदार विनायक राऊत
राजकारणातली भविष्यवाणी करण्याचा ठेका फक्त नारायणराव राणे ( Minister Narayan Rane ) यांनीच घेतला आहे. त्यांची प्रत्येकवेळची भविष्यवाणी ही हवेवरची वाणी ठरलेली आहे. त्यामुळे असल्या भविष्यवाणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत ( MP Vinayak Raut ) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर केली आहे.
‘त्या’ कोंबड्यांसाठीच सरकार बनवण्याचे भाकीत; नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पडेल असे भाकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांनी आज केले होते. याला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. काही लोकांकडे २३ वर्षात नवसाच्या इतक्या कोंबड्या आणि बोकड जमले, की आता 'त्या' कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचे भाकीत करावेच लागते, असा खरमरीत टोला नवाब मलिक यांनी राणेंना लगावला. मात्र, भाजपच्या नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी राज्यातील सरकार पडणार नाही. महाविकास आघाडी सरकार खंबीर आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.
हेही वाचा -Narayan Rane : मार्चमध्ये महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होणार - केंद्रीय मंत्री नारायण राणे