मुंबई -शांततेत निदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केंद्राचे गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने गाडी चढविली. या दुर्घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. एवढी मोठी घटना घडल्यानंतर ही केंद्र सरकार याबाबत कोणतीही भूमिका घेत नाही. केंद्र सरकारने संबंधित गृह राज्यमंत्री (अजित मिश्रा) यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले, की लखीमपूर घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकारने संबंधितावर कारवाई केली नाही. या घटनेची 8 दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर संबंधित मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आली. घटनेच्या पहिल्या दिवसापासूनच घटनेत सत्यता नसल्याची राज्य सरकारची भूमिका होती. मात्र, उत्तर प्रदेश सरकारला आपली जबाबदारी झटकता येणार नाही.
हेही वाचा-सुरक्षा दलाला मोठे यश! त्रालमधील चकमकीत जैश कमांडरला कंठस्नान
महाविकास आघाडीने पुकारलेला बंद शांततेत पार
पुढे शरद पवार म्हणाले, की लखीमपूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाविकास आघाडीच्या या हाकेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेना बंदमध्ये सामील असतानाही राज्यात शांततेत बंद पार पडला. बंद शांततेत पार पडल्याने शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे तसेच राज्यातील जनतेचे आभार मानले.
हेही वाचा-महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह
साखर कारखानदारांना एकरकमी एफआरपी शक्य नाही-
राज्यामध्ये यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे पुढच्या वर्षी उसाचे रेकॉर्डब्रेक उत्पादन होण्याची शक्यता आहे. तसेच यावर्षी ही उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार आहे. ही साखर टप्प्याटप्प्याने बाजारात आणणे आवश्यक आहे. साखर एकाचवेळी बाजारात विक्रीस आल्यास साखरेचे भाव मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच काही लोकांकडून एकरकमी एफआरपीची मागणी होत आहे. मात्र आपल्याच बाजूच्या गुजरात राज्यामध्ये 50, 30 आणि 20 टक्के अशा स्वरुपात एफआरपी दिली जाते. आपल्या राज्यातही अशीच पद्धत आहे. तसेच एकरकमी एफआरपी साखर कारखानदारांना जमणार नसल्याचे यावेळी शरद पवार यांनी सांगितले. तसेच एफआरपी संदर्भात कोणाला चर्चा करायची असेल तर, आपण या चर्चेसाठी तयार आहोत, असेही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-child covid vaccination लहान मुलांसाठीच्या या २ व्हॅक्सिनला मंजुरी, या २ व्हॅक्सिनच्या ट्रायल सुरु