महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar : आजच चौकशी केली तरी चालेल, पण...;पराचा कावळा करण्याचा प्रयत्न... - Jitendra Awhad

बैठकीच्या इतिवृत्तातं सगळ Sharad Pawar Explanation Patra Chawl Scam case स्पष्ट आहे. ते तुमच्या समोर आहे. चौकशी आजही केली तरी चालेल, मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी (Sharad Pawar) दिली आहे. आज त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेतली.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Sep 21, 2022, 1:07 PM IST

Updated : Sep 21, 2022, 2:52 PM IST

मुंबई -पत्राचाळ घोटाळ्यावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांचा नाव यात आल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. अशात आता शरद पवारांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बैठकीच्या इतिवृत्तातं सगळ Sharad Pawar Explanation Patra Chawl Scam case स्पष्ट आहे. ते तुमच्या समोर आहे. चौकशी आजही केली तरी चालेल, मात्र राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करतांना शरद पवार

अतुल भातखळकरांचं पत्र : पत्राचाळ प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी यासंबंधीत बैठक घेतली होती. या बैठकीत पत्राचाळ संबंधी निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार यांची देखील या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी करणारे पत्र अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं होतं.

पराचा कावळा करु नका: मात्र भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेल्या आरोपावर, आता खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. जनतेसमोरील महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून केवळ, इतर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पराचा कावळा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू असल्याचं या आरोपांवर शरद पवार म्हणाले आहेत. या सर्व प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी करावी, मात्र जर चौकशी अंतिम यातून काही निघालं नाही तर, राज्य सरकार काय करेल? याचे देखील स्पष्टीकरण राज्य सरकारने द्यायला हवं, असं शरद पवार म्हणाले आहेत.

पवारांनी केले आरोपांचे खंडन : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षाच्या आरोपांना शरद पवार यांनी आज उत्तर दिले. पत्राचाळ प्रकरणांमध्ये संजय राऊत यांच्यावर ॲडिशनल चार्जशीट दाखल करण्यात आली. ईडी कडून कोर्टात सादर करण्यात आलेल्या या एडिशनल चार्जशीट मध्ये शरद पवार यांनीही बैठक घेतल्या बाबतचा उल्लेख होता. या उल्लेखानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

बैठकीतून केवळ मध्यस्थी करण्याचा प्रयत्न :शरद पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर हजारो बैठका त्यांनी आजपर्यंत घेतल्या आहेत. या बैठकाच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचाच प्रयत्न शरद पवार यांनी नेहमी केला. तसाच प्रयत्न पत्राचाळ प्रश्नावर देखील शरद पवार यांनी केला होता. 14 जानेवारी 2006 ला पत्राचाळ प्रकरणातली ही बैठक झाली होती, या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. यासोबतच या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासहित इतर अधिकारी देखील या बैठकीला उपस्थित असून; या बैठकीचा इतिवृत्त सादर करण्यात आला होता. पत्राचाळ प्रकरणातील भाडेकरूंची समस्या दूर करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. मात्र या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो राज्य सरकार घेईल, तसेच संबंधित कागदपत्र अधिकारी राज्य सरकारला सादर करतील अशा प्रकारचे इतिवृत्त या बैठकीनंतर तयार करण्यात आलं होतं. असंच स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या पत्रकार परिषदेत दिल आहे.

Last Updated : Sep 21, 2022, 2:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details