मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पोटात दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी सायंकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पित्ताशयात असणाऱ्या असणारे खडे काढण्यात आल्याचेही टोपे यांनी सांगितले.
पवारांची प्रकृती स्थिर
शरद पवार यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली होती. पवार यांना अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पवार यांच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पित्ताशयाच्या विकाराचे निदान झाले होते. पवार यांच्यावर ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार होती. मात्र मंगळवारी त्यांना त्रास होवू लागला. त्यानंतर त्यांच्यावर मंगळवारी रात्रीच शस्रक्रीया करण्यात आली.
सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार
यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी ब्रीच कँडी रूग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. त्यांनी ट्वीटकरत डॉक्टरांचे आभार मानले आहेत. दरम्यान पवारांवर शस्रक्रीया होत असताना रूग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि आमदार रोहीत पवार उपस्थित होते.
सुप्रिया सुळेंनी मानले डॉक्टरांचे आभार यांनी केली पवारांच्या प्रकृतीची विचारपूस
शरद पवारांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीसह विरोधी पक्ष भाजपातील केंद्रीय नेत्यांनी देखील फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गानसाम्राज्ञी लता मंगेशकर, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकूर, माजी मंत्री सुरेश प्रभू, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आशिष शेलार, कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवार यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सर्वांचे शरद पवारांनी ट्विट करून आभार मानले आहेत.
शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द
पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा प्रचार करण्यासाठी स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे 1 एप्रिलपासून पश्चिम बंगालला जाणार होते. 1 एप्रिल ते 3 एप्रिल दरम्यान पवारांचा हा प्रचारदौरा होता. मात्र, रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने त्यांचे सर्व नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
हेही वाचा - मोदींसह या नेत्यांनी केली पवारांच्या प्रकृतीची विचारपूस, पवार ट्विटरवर झाले व्यक्त
हेही वाचा -करमुसे मारहाण प्रकरण : मंत्री आव्हाड यांच्या अडचणीत वाढ?, सीडीआर-एसडीआर जपून ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश