मुंबई - गोव्यातही महाविकास आघाडी प्रमाणे आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने प्रयत्न केले. मात्र, गोव्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांमुळे आघाडी होऊ शकली नाही. (NCP-ShivSena alliance In Goa) मात्र, काँग्रेसला गोव्यामध्ये सत्तेत येण्यासाठी शिवसेनेकडून शुभेच्छा आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून गोव्यातील जागावाटपाबाबत घोषणा केली जाईल. यासंबंधी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार (NCP and Shiv Sena will announce alliance in Goa)असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे. गोव्यात जर खिचडी बनत असेल तर त्यात कडीपत्ता, हळद अशापैकी काही न काही आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस जरूर असणार आहे. (Goa Assembly Election 2022) आम्ही जास्त जागेवर निवडणूक लढवत नाहीत. आम्हाला (Sanjay Raut In goa)आमची मर्यादा काय आहे, आम्हाला माहीत आहे. आम्हाला काय करायचे आहे, मला वाटते तिथे काँग्रेस आणि भाजप मध्ये मोठी लढाई होईल, तृणमूल तिकडे 40 जागांवर लढत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा चेहेरा देऊ शकतात असेही यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर मंत्री मायकल लोगो यांनी राजीनामा
गोव्याच्या जनतेचा जनाधार भारतीय जनता पक्षाच्या मागे असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस हे गोव्यामध्ये गेल्यानंतरच भारतीय जनता पक्ष फुटला. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात लक्ष घालायला सुरुवात केल्यानंतर गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री मायकल लोगो यांनी राजीनामा दिला. तसेच भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने देखील पक्ष सोडला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत जे युद्ध सुरू आहे. त्या विरोधात लढाई करावी अशी खरमरीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत ( sanjay raut criticized devendra fadnavis ) यांनी केली आहे. मुंबई आज ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे ( Sanjay Raut press conference ) वक्तव्य केले.
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाई नोटांशी -
गोव्यामध्ये शिवसेनेची लढाईही नोटांशीचं आहे, निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील गोव्यामध्ये नोटांनी भरलेल्या बॅगा पाठवल्या जात आहेत. त्या भरलेल्या नोटांच्या बॅगाशी शिवसेना लढणार असून गोव्याच्या जनतेने नोटांच्या दबावाखाली येऊ नये असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.