मुंबई : वेगवेगळ्या आरोपांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अनिल देशमुखांना अडचणीत आणण्यामागे भाजपाची यंत्रणा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर याला प्रत्युत्तर देताना याबाबत जयंत पाटील यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांनी हे सिद्ध करावं असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे.
भाजपाच्या यंत्रणेकडून त्रास
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भाजपच्या यंत्रणेकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुंबईतील बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश आपल्याला गृहमंत्र्यांनी दिल्याचा खळबळजनक आरोप पत्राद्वारे केला होता. मात्र माजी पोलीस आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर ते स्वतःच देश सोडून पळून गेले आहेत. आरोप करणारे परमबीर सिंह हेच जर देश सोडून पळून जात असतील तर केंद्रीय तपास यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
आरोप सिद्ध करावे - शेलार
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे तपास यंत्रणा त्यांच्या मागावर आहेत. मात्र यामागे भारतीय जनता पक्षाची यंत्रणा असल्याचा आरोप जयंत पाटील करत असतील तर, त्यांनी ते सिद्ध करावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी दिले आहे.
देशमुख यांना समन्स
देशमुखांना समन्स : राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप! - जयंत पाटलांचे भाजपवर आरोप
अनिल देशमुख यांना समन्स बजावल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अनिल देशमुखांना अडचणीत आणण्यामागे भाजपाची यंत्रणा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. तर याला प्रत्युत्तर देताना याबाबत जयंत पाटील यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांनी हे सिद्ध करावं असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी दिलं आहे.
देशमुखांना समन्स : राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप!
अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीकडून पाच वेळा समन्स बजावून देखील अनिल देशमुख चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहत नाही. यावर ईडीकडून सत्र न्यायालयात धाव घेण्यात आली. यावर 1ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने थेट माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांना समन्स धाडून कोर्टामध्ये आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.
हेही वाचा -शोधून शोधून दमले, पण परमबीर सिंग सापडेना - जयंत पाटील