महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

NCP on Tanaji Sawant : तानाजी सावंतांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल; राष्ट्रवादी आक्रमक - मराठ्यांना आरक्षणाची खाज

"मराठ्यांना आरक्षणाची "खाज सुटली" आहे", असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या ( Tongue Rubbed while Talking on Maratha Reservation ) वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोंदवण्यात आला आहे. आरक्षण मागणे म्हणजे खाज आहे का? आरोग्य मंत्री हे मानसिक रोगी असून, सत्ता आणि संपत्तीचा माज असणाऱ्या तानाजी सावंत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण ( NCP leader Suraj Chavan has Warned ) यांनी दिला आहे.

NCP Aggressive on Tanaji Sawant :
राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांचा इशारा

By

Published : Sep 26, 2022, 1:00 PM IST

Updated : Sep 26, 2022, 1:51 PM IST

मुंबई :मराठा आरक्षण मुद्यावर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घासरल्यानंतर त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. "मराठ्यांना आरक्षणाची "खाज सुटली" आहे", ( Marathas are Itching For Reservation ) असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या ( Tongue Rubbed while Talking on Maratha Reservation ) वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोंदवण्यात आला आहे. आरक्षण मागणे म्हणजे खाज आहे का? आरोग्य मंत्री हे मानसिक रोगी असून, सत्ता आणि संपत्तीचा माज असणाऱ्या तानाजी सावंत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण ( NCP leader Suraj Chavan has Warned ) यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून तानाजी सावंतांचा निषेध

तानाजी सावंत यांची मराठा आरक्षणावर जीभ घसरली :मराठा आरक्षण मागताना मराठा समाज आज ओबीसीतून आरक्षण मागत आहे. उद्या एससीमधून आरक्षण मागतील. आताच आरक्षणाची मागणी परत का वाढू लागली, असे सवाल तानाजी सावंत यांनी उपस्थित केले होते. तसेच आमचे सरकार मराठा आरक्षण नक्की देईल, असा विश्वासदेखील त्यांनी कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मराठा आरक्षण प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

तानाजी सावंत यांची राष्ट्रवादीवर टीका :सत्तेत असताना आरक्षणासाठी काही केले नाही. मात्र, आता सत्ता गेल्यावर पुन्हा आरक्षण मुद्याला समोर आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तानाजी सावंत यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेल्या आरोपानंतर आता तानाजी सावंत यांच्या विरोधात राष्ट्रवादीदेखील आक्रमक झाली आहे.

नेमके काय म्हणाले तानाजी सावंत :दरम्यान तानाजी सावंताच्या वक्तव्यावर मराठा महासंघानेदेखील आक्षेप घेतला. तसेच सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असे वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त तानाजी सावंत यांनी केले आहे. यांना आरक्षण पाहिजे, आता म्हणतात ओबीसीमधून पाहिजे. उद्या म्हणतील एससीमधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असेही ते म्हणाले.

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करताना विरोधकांना ज्या भाषेत सुनावले त्यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात दोन वेळा मराठा आरक्षण गेले, असे आरोपही तानाजी सावंत यांनी केला आहे. ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं सावंत शनिवारी म्हणाले होता. दरम्यान, शनिवारी बीडमध्ये तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया :चंद्रकांत पाटील यांनी त्यांची बाजू मांडली : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, तानाजी सावंत यांनी एखादे वाक्य म्हटले की, त्याची तोडमोड करून ते समोर आणले जाते. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचे समजले पाहिजे. आमच्या रावसाहेब दानवे यांच्याबाबतीत नेहमी हेच होते. पण, ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की, ते म्हणतात यात काय आहे. तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचे होते की, मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिले.

Last Updated : Sep 26, 2022, 1:51 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details